आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी हवी संस्कारमय आणि पर्यावरणवादी पिढी; पद्मश्री पोपटराव पवार यांचे प्रतिपादन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना कला, क्रीडा गुणांबरोबर संस्काराला प्रोत्साहन शाळेतून मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी व भविष्यातील प्रश्‍नांचा वेध घेणारी शिक्षण पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटातून पृथ्वीचे असतित्व टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण व आरोग्याच्या प्रश्‍नावर शिक्षण देऊन संस्कारमय पर्यावरणवादी भावी पिढी घडवावी लागेल, असे प्रतिपादन शासनाच्या आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार यांनी केले.

लहान मुलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी नन्हा ज्ञान फाऊंडेशन, पुणे व आयकॉन पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजित बाल मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी पद्मश्री पवार बोलत होते. रेल्वे स्टेशन रस्त्यावरील आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या दोन दिवसीय बाल मेळाव्याला रमेश फिरोदिया, स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुथा, मंगला मुथा, अमित मुथा, सोनल मुथा, गौरी मुथा, रोमल सुराणा, प्रिती मुथीयान, शैलेजा लड्डा, आराधना राणा, मुख्याध्यापिका दिपिका नगरवाला आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पद्मश्री पवार म्हणाले, रासायनिक खतामुळे आरोग्यावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. सदृढ आरोग्यासाठी नैसर्गिक खतांची गरज असल्याचे सांगितले. मेळाव्यात २२ शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...