आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:टायनी टाॅट्स नर्सरी स्कूलमध्ये‎ घडते संस्कारक्षम पिढी ; फुंदे‎

नगर‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा हे आता काही लोकांसाठी‎ व्यवसायाचे केंद्र झाले असताना,‎ टायनी टाॅट्स नर्सरी स्कूलमध्ये एक‎ संस्कारक्षम, आदर्श पिढी घडत‎ आहे. ही शाळा म्हणजे‎ विठोबा-रुक्माईचे मंदिर असल्याचे‎ प्रतिपादन डॉ. अविनाश फुंदे यांनी‎ केले.‎ टायनी टॉट्स नर्सरी स्कूलच्या‎ वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त‎ सावेडीतील माऊल सभागृहात‎ चिमुकल्याचा सांस्कृतिक कार्यक्रम‎ पार पडला.

त्यात एलकेजी,‎ युकेजीच्या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी‎ विविध गीतांवर नृत्य सादर केले.‎ यावेळी अनेक पालकांनी ठेका‎ धरला. भ्रष्टाचार निर्मूलन ते कोकण‎ दर्शन, गुजरातचा गरबा, जवानांची‎ मस्ती, खंडोबाचे दर्शन, विठ्ठलाचेचे‎ पूजन, छत्रपती शिवाजी‎ महाराजांवरील गीतांनी पालक वर्ग‎ भारावून गेला होता. आपल्या‎ छोट्याच्या लीला पाहताना,‎ अनेकांच्या तोंडावर कौतुकाचे भाव‎ होते. यावेळी डॉ. राकेश गांधी, प्रा.‎ विजय कांडके , प्रा. नॅन्सी कौल,‎ कालिंदी पवार, मल्लीकार्जून सर,‎ निकम सर, गायकवाड मॅडम आदी‎ उपस्थित होते. प्रास्ताविक नर्सरी‎ स्कूलचे संचालक मानसिंग पाटील‎ यांनी केले. सूत्रसंचालन टायनी‎ टॉट्स नर्सरी स्कूलच्या‎ मुख्याध्यापिका मीरा पाटील यांनी‎ केले.

बातम्या आणखी आहेत...