आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमजुराचा मृत्यू‎:वीज पडून शेतमजुराचा मृत्यू‎

श्रीरामपूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह तालुक्यातील उत्तरेकडील‎ काही भागात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास‎ अचानक गारांसह वादळी पाऊस झाला. खोकर येथे‎ वीज पडून राजेंद्र मोरे, वय ५० या शेतमजुराचा मृत्यू‎ झाला, तर त्यांच्या पत्नी सुनीता मोरे या जखमी‎ झाल्या.

शनिवारी दुपारी चार वाजता अचानक‎ तालुक्यात अवकाळी वादळी पावसाने हजेरी‎ लावली. खोकर येथे गाईच्या गोठ्यावर वीज‎ पडल्याने राजेंद्र मोरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना‎ तात्काळ साखर कामगार रुग्णालयात दाखल केले‎ होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.‎

बातम्या आणखी आहेत...