आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मदहना प्रयत्न:जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाजगी सावकारांनी हडप केलेली जमीन परत मिळावी, यासाठी सुनील शंकर नगरे (म्हसने फाटा, सुपा, पारनेर) या शेतकऱ्याने गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरे यांनी उक्कलगाव (श्रीगोंदा) व रांजणगाव मशीद (पारनेर) येथील खाजगी सावकारांकडून अडीच लाख रुपये कर्ज घेतले. त्याबद्दल त्यांची ५० गुंठे जमीन सोडबोलीच्या कराराने दिली. मात्र कर्जापोटी एकूण १० लाख रुपये देऊनही तीघा सावकारांनी जमीन परत दिली नाही. उलट जीवे मारण्याची धमकी दिली, अशी त्यांची तक्रार आहे.

यासंदर्भात सहकार विभागाचे तालुका उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही, असे म्हणत नगरे यांनी समवेत आणलेल्या बाटलीतील डिझेल अंगावरून ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिस कर्मचारी तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी नगरे यांच्याविरुद्ध आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...