आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या तपोवन रोडवरील बंद करण्यात आलेल्या सावेडी कचरा डेपोत शनिवारी (४ जून) भीषण आग लागली. डेपोलगत असलेल्या महावितरणच्या सब स्टेशनच्या गेटलाही आगीची झळ बसली. मात्र महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
मागील दोन वर्षांपासून सावेडी येथील कचरा डेपो बंद करण्यात आलेला आहे. या डेपोत कचरा संकलनही बंद आहे. मात्र डेपोत जुना कचरा अद्यापही तसाच पडून आहे. तसेच गवतही वाढलेले आहे. डेपो चा प्रवेशद्वाराजवळील गवताला आग लागली वाऱ्यामुळे डेपोतील गवताला व जुन्या कचऱ्यापर्यंत ही आग पसरली. आगीमध्ये झाडे, तसेच ठिबक सिंचनसाठी केलेली पाईपलाईन जळून खाक झाली आहे.
दरम्यान, कचरा डेपो शेजारी असलेल्या महावितरणच्या सबस्टेशनच्या गेटपर्यंत आगीची झळ बसली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाचे वाहनचालक सी. आर. भांगरे, पांडुरंग झिने, माडगे आदींनी आग आटोक्यात आणली. कचरा डेपोचा आवारात नव्याने ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्यात आली आहे. शेजारीच महावितरणचे मोठे सबस्टेशनही आहे. आग तात्काळ आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी अनेक वेळा सावेडी कचरा डेपोला आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. जाणीवपूर्वक आग लावण्याची प्रकरणेही चर्चेत आहेत. सध्या डेपो बंद असतानाही आग लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.