आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठ जणांच्या टोळीने खासगी बसवरील चालक व क्लिनरला कट मारल्याचा कारणातून लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. क्लिनरच्या खिशातील १० हजार रूपयांची रक्कम काढून घेतली.
सोमवारी पहाटे नगर-औरंगाबाद रोडवरील महाराजा हॉटेलजवळ ही घटना घडली. जखमी सागर ज्ञानेश्वरराव शिंदे (वय ३५ रा. वर्धा) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अब्रार शेख (रा. अलमगीर, भिंगार), रेहान शेख (रा. झेंडीगेट), अवेज शेख (रा. जुनी कोर्ट गल्ली), अकीब ऊर्फ चौधरी (रा. बेलदार गल्ली), मोसीन शेख (रा. बेलदार गल्ली), नदीम (पूर्ण नाव माहिती नाही, रा. जुना कोर्टच्या पाठीमागे), गुड्डू फुलारी (रा. बंगाल चौकी), मोजमिल (पूर्ण नाव माहिती नाही, रा. झेंडीगेट) या आठ जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बसमधील प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर तोफखाना पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी लुटारू पळून गेले. पोलिसांनी एकाला पाठलाग करून पकडले. पकडलेल्या लुटारूकडून इतरांची नावे निष्पन्न झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.