आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी वृत्त:गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या तीन जणांच्या टोळीला अटक ; कट्टे व 10 जिवंत काडतुसे जप्त

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपुरात करण्याच्या उद्देशाने बेकायदशीररित्या ८ गावठी कट्टे व १० जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तीन आरोपींची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. राहुलसिंग फत्तुसिंग कलानी (वय २५), आकाशसिंग बादलसिंग जुनी (वय २२) अक्षयसिंग तिलकसिंग कलानी (सर्व रा. श्रीरामपूर बाजारतळ, गुरुगोविंदसिंग नगर, वॉर्ड नं. ३, ता. श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

श्रीरामपपूर येथे तीन इसम हे गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी हॉटेल राधिकाजवळ येणार असल्याची माहिती कटके यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, भिमराज खसे, शंकर चौधरी, सुरेश माळी, रवि सोनटक्के, मयूर गायकवाड, सागर ससाणे व चंद्रकांत कुसळकर संशयितांना घेराव घातला. पळून जात असताना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...