आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामोर्चा:राज्यपाल हटावसाठी मुंबईला महामोर्चा

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापुरूषांचा अवमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी व भारतीय कम्युनिस्ट पक्षासह सर्व डाव्या पुरोगामी पक्षाच्या वतीने शनिवारी (१७ डिसेंबर) मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे.

कोश्यारी हटाव, महाराष्ट्र बचाव या घोषणेने मोर्चाची सुरुवात होणार असून, या मोर्चात राज्यातील सर्व भाकपचे पदाधिकारी, कार्यकर्ते डावे पुरोगामी पक्ष व संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन भाकपचे राज्य सचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे यांनी केले आहे. शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान राज्यपाल कोश्यारी यांनी जाणीवपूर्वक अवमान केला आहे.

बातम्या आणखी आहेत...