आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिराचे आयोजन:निरोगी शरीर हीच माणसाची खरी संपत्ती ; झिंजुर्के महाराज

शेवगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी शरीर हीच माणसाची खरी संपत्ती आहे, असे मत श्रीसंत जोग महाराज संस्थानचे अध्यक्ष राम महाराज झिजुर्के यांनी व्यक्त केले.तालुक्यातील आखेगाव येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अंधमुक्त व्हिलेज या संकल्पनेतून श्रीसंत जोग महाराज संस्थान आखेगाव येथे मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटी, बुधराणी हॉस्पिटल पुणे, कामगार नेते काटेमामा शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे माजी अध्यक्ष तथा अंधमुक्त व्हिलेज संकल्पनेचे प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब चौधरी यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले. बुधराणी हॉस्पिटलच्या माया आल्हाट यांनी १९८ नेत्र रुग्णांची तपासणी केली. फेरोज खान यांनी २७ रुग्णांना अल्पदरात चष्मे दिले. शिबिरामधून ४१ नेत्र रुग्णांची शस्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून लवकरच बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याप्रसंगी काटेमामा शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष शिवाजीराव काटे, डॉ. भागनाथ काटे, सरपंच बाबासाहेब गोर्डे, शिवसेना शहरप्रमुख ॲड. सिद्धार्थ काटे, युवासेना तालुकाप्रमुख शितल पुरनाळे, उपशहरप्रमुख कानिफ कर्डिले , शाखाप्रमुख अशोक गवते, अक्षय बोडखे, मुरलीधर नाचन गुरुजी , झिंजुर्के गुरुजी, डॉ. भारत झिंजुर्के, त्रिंबक अण्णा काटे, म्हातरदेव काटे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...