आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेवटच्या दिवशी आरासी पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी; शहरासह जिल्ह्यातील भाविकांचा ओघ वाढला

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षानंतर प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने, गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांनी मोठ्या भक्तीभावाने गणरायाचे स्वागत केले. दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज लाडका बाप्पा सर्वांचा निरोप घेणार आहे. या निरोपाच्या पूर्वसंध्येला देखावे पाहण्यासाठी नगर शहरासह जिल्हाभरातील भाविकांची मोठी गर्दी केली होती.

अहमदनगरचे ग्रामदैवत विषाल गणपतीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील भाविक येतात. त्याचबरोबर नगर शहरातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून मानाच्या गणेशासह विविध सार्वजनिक मंडळांकडून साकारले जाणारे, देखावे लक्षवेधी असतात. यंदा गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक व धार्मीक विषयांवर देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले.बहुतांश देखावे ५ सप्टेंबरनंतर भाविकांसाठी खुले झाले, संगीताच्या तालावर थिरकणारी विद्युत रोषणाईंची आरास बहुतेक मंडळांनी केली होती. माळीवाडा भागातील नवयुग तरूण मंडळाने ७० फुटी श्रीगणेश मंदिराची रेखीव आरास विद्युत रोषणाईत साकारली. स्वस्तीत चौकांतील २५ फुटी किंग काँग मर्ती राजयोग प्रतिष्ठानने स्थापन केली होती.

हा हालता देखावा लहानग्यांसाठी आकर्षणाचा ठरला. त्याबरोबरच सिद्धेश्वर मंडळाने श्रीरामभक्त वीर अंगद व रावण भेटीचा प्रसंग हालत्या देखाव्यातून साकारला. लाडका बाप्पा शुक्रवारी निरोप घेणार असल्याने, पूर्वसंध्येला गुरूवारी शहरभर देखावे पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. कोणत्याही निर्बंधांविना हा गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला.

या आरासीही ठरल्या लक्षवेधी
कपिलेश्वर मंडळाने परशुरामाची अग्नी परीक्षा, महालक्ष्मी तरूण मंडळाने संत ज्ञानेश्वर समाधी सोहळा, माळीवाडा मित्र मंडळाने रंगपंचमी, नेता सुभाष चौकात कठपुतली नृत्य पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. बागडपट्टीत शंकर महाराज देखावा, नवयुग मंडळाने ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तेलीखुंट मित्र मंडळाने बालगुन्हेगारी, संगम मंडळाचे जगण्याचे सूत्र चुकतेय हे जिवंत देखावे चर्चेत राहिले.

बातम्या आणखी आहेत...