आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:रस्त्यांच्या प्रश्नासाठी मुंबईत करणार उपोषण

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांकडे नगर विकास खात्याचे लक्ष वेधले आहे. जर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर मुंबईत जाऊन मंत्रालयात उपोषण केले जाईल असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. काळे म्हणाले, अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नावरून काळे यांनी मुंबईत मंत्रालयात नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद चिंचोलीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. मी आमदार नसलो तरी वेळप्रसंगी नगरकरांसाठी मी मुंबईत उपोषणास बसेल.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र देऊन लक्ष वेधले आहे. अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यापूर्वीच्या दर्जाहीन रस्त्यांच्या कामामुळे जुने रस्ते गायब झाले आहेत. सुस्थितीतील रस्त्यांची लोकप्रतिनिधींच्या अट्टाहासपोटी खोदाई करण्यात आली. जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असून त्यांची कामे देखील अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. अनेक रस्त्यांची दुबार नावे देत स्वतः मनपाने कामे झाले असे घोषित केले असून यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...