आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल:शहर पाणी योजनेवरील नवीन मुख्य जलवाहिनीला गळती

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पाणी पुरवठा योजनेच्या ११०० एमएम नवीन मुख्य जलवाहिनी शिंगवे गावाजवळील देव नदी येथे पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू असून जलवाहिनी दुरुस्तीचे काम मनपाकडून सुरू आहे. दरम्यान, यामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. काल दुपारनंतर पाणी वाटप असलेल्या स्टेशन रोड परिसर, विनायकनगर, कायनेटीक चौक परिसरास पाणी पुरवठा झालेला नाही.

या भागास आज (११ नोव्हेंबर) नेहमीच्या वेळेत पाणीपुरवठा होईल. सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगाव, कापड बाजार, आनंदी बाजार, नवीपेठ, माणिक चौक या भागास शनिवारी (१२ नोव्हेंबर) पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको या भागात रविवारी (१३ नोव्हेंबर) पाणी सोडण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...