आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखांचे कर्ज:रस्त्याची जागा गहाण ठेवून घेतले 40 लाखांचे कर्ज ; महसूल विभागाने बंद न केल्याने वाद

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोल्हेगावातील बिनशेती झालेल्या व रस्त्याचे क्षेत्र म्हणून नोंद झालेल्या जागेचे गहाणखत करून पतसंस्थेने ४० लाखांचे कर्ज दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तेथील प्लॉट धारकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली आहे. महिनाभर धरणे आंदोलनामुळे वादग्रस्त ठरलेली ती जागा पुन्हा चर्चेत आली आहे.१९९६ मध्ये बिनशेती झालेल्या जागेचा जुना शेत जमिनीचा उतारा महसूल विभागाने बंद न केल्याने वाद निर्माण झाला आहे.

एकाच जागेचे दोन उतारे चालू असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर व या रस्त्याच्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्यावर महिनाभर आंदोलन झाले. त्यानंतर मनपाने या जागेवर स्वत:चे नाव लावण्याचा प्रस्तावही दिलेला आहे. मात्र, आता या जागेवर धनसंपदा पतसंस्थेने गहाणखत करुन ४० लाखांचे कर्ज सुर्यभान कातोरे यांना दिल्याची तक्रार प्लॉट धारकांनी केली आहे. रस्त्याचे क्षेत्र असलेला उतारा चालू असतानाही दुसरा उतारा वापरून त्याचे गहाणखत करुन कर्ज प्रकरण केले आहे. याची चौकशी करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...