आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:माणूस हलक्या कानाचा नसावा, भगवंताची कृपा होईल अशी उपासना करा; सुदाम महाराज कातकडे

कोपरगाव शहरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाच्या अंतकरणामध्ये भाव असणे महत्त्वाचे आहे. माणूस हलक्या कानाचा नसावा, भगवंताची कृपा होईल अशी उपासना माणसाने करणे गरजेचे आहे. निष्काम भावाने भक्ती केली पाहिजे, असे आवाहन सरला बेट येथील सुदाम महाराज कातकडे यांनी केले.शहरातील कहार समाज व भाजी विक्रेता, शेतकरी गणेशोत्सव मंडळाने आयोजित कीर्तनात ते बोलत होते. कोपरगाव गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या या मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कीर्तन व भंडाऱ्याचा कार्यक्रम केला जातो. यावेळी गायनावर सातसंगत मनोज महाराज, अरुण पगारे महाराज, तर मृदंगवादन कृष्णा महाराज लकारे यांनी केले. रामभाऊ चौधरी महाराज, भरत महाराज आदींनी कीर्तनात सहभाग घेतला.

यावेळी अमृत संजीवनीचे पराग संधान, मंडळाचे अध्यक्ष अर्जुन पंडोरे, उपाध्यक्ष अंकुश गंगूले, लखन कुंडारे, वाल्मिक लहिरे, बाळा गंगुले, रवींद्र चौधरी, दादाभाऊ गंगुले, अशोक लकारे,जनार्दन जगताप, सोमनाथ गंगूले, संदीप जाधव, गोरख पंडोरे, सचिन बिरोटे, सचिन गंगूले, मुकेश डिंबर, निसार अत्तार, नीलेश जगताप, नानासाहेब गहिरे, सचिन लचुरे,अरुण गंगूले, ईश्वर पंडोरे, तुकाराम गहिरे, प्रकाश पंडोरे, पंडीत पंडोरे, अशोक कंदे, ईश्वर लकारे, मनोज लकारे, गणेश वनछय्या, विजय लकारे, प्रकाश पंडोरे, हरिचंद्र लकारे, अल्ताफ शहा, संजय गंगुले, रामकृष्ण सुरवय्या, भैय्या सुरवय्या, भावसाहेब जाधव, संजय गंगुले, पोपट लिंबुरे, रवींद्र लचुरे,सागर पंडोरे, संतोष मोहरे, सुनील काजळे, संजय जगताप, सुनील फंड, सनी वाघ आदी उपस्थित होते.

कातकडे महाराज म्हणाले, आपला हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे .हिंदू धर्माच्या आधीपासून कोणताही धर्म नाही. आपण आपल्या हिंदू धर्माचे पालन करत संस्कृतीचे पालन केले पाहिजे. हिंदू धर्माच पालन व गोमतेचे रक्षण केले पाहिजे. धर्माचे पालन करण्यासाठी बजरंग दल सारखे संघटना निर्माण झाल्या आहेत.ज्या ठिकाणी हिंदू धर्मावर गदा येते त्या ठिकाणी आपण सज्ज असले पाहिजे, असेही कातकडे महाराज म्हणाले. यावेळी मंडळाच्या वतीने डाळ -बट्टी व लापशीचा आठ हजार लोकांचा भंडारा करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...