आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाड लावणार:सावेडीत प्रभागातील प्रत्येक घरासमोर एक आंब्याचे झाड लावणार

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणाचे महत्त्व ओळखून संपूर्ण शहरात अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी व या वृक्षांचे संवर्धन व्हावे, यासाठी मोठी लोकचळवळ उभारण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधी पक्षनेता व वृक्ष समितीचे अध्यक्ष संपत बारस्कर यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण शहरात ७ हजार वृक्ष लागवडीसाठी नियोजन केले आहे. याचाच भाग म्हणून सावेडी उपनगरातील प्रभाग एकमध्ये प्रत्येक घरासमोर एक आंब्याचे झाड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.शासनाकडून दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी मोठा कार्यक्रम हाती घेतला जात आहे.

नगर शहरातही काही सामाजिक संस्था व नगरसेवक वृक्ष लागवड व संवर्धनासाठी मागील काही वर्षांपासून पुढाकार घेत आहेत. सावेडी परिसरात वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी मागील काही वर्षात संपत बारस्कर यांनी महापालिकेच्या पुढाकारातून उपक्रम हाती घेतले आहेत. मनपा वृक्ष समितीच्या माध्यमातून शहरात ७ हजार वृक्ष लागवडीसाठी निर्णय घेतला आहे.

याच लोक चळवळीचा भाग म्हणून प्रभाग एक मधील प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर झाड लावण्यात येणार आहे. त्याच्या संवर्धनाची जबाबदारी संबंधित कुटुंबावर दिली जाणार आहे. त्याची सुरुवातही दोन दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण प्रभागात वृक्षारोपण झाल्यानंतर ही चळवळ संपूर्ण शहरात राबवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

सव्वा लाख रुपयांचे मानधन वृक्ष लागवडीसाठी
प्रभागातील नागरिकांना बरोबर घेऊन वृक्षारोपणासाठी लोकचळवळ उभी केली आहे. वृक्षरोपणामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होते. या कामासाठी माझ्या पदाच्या कारकिर्दीतील नगरसेवक पदाचे सर्व मानधन वृक्षारोपण व संवर्धनासाठी खर्च केले आहे. यावर्षीचा १.२५ लाख रुपयांचा धनादेश वृक्षरोपणासाठी दिला आहे. दहा वर्षात सुमारे १० लाख रुपयांचे मानधन वृक्ष संवर्धनासाठी खर्च केल्याचे संपत बारस्कर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...