आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:मौल्यवान वस्तू दागिन्यांपेक्षा मनुष्याचे जीवन महत्वाचे ; पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांचे आवाहन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गौरी-गणपती नंतर दसरा-दिवाळी हा दोन महिन्यांचा सणांचा उत्सव असल्याने या काळात महिलांनी आरोग्यबरोबरच मौल्यवान वस्तूंचीही काळजी घेण्याचे आवश्यकता आहे. सध्याच्या ग्लोबोलायझेशनच्या युगात मोबाईल जनसंपर्काऐवजी करमणुकीचे साधन बनत चालला आहे. अनेक चोऱ्या या मोबाईलवर करमणूक करत असतांना होणाऱ्या दुर्लक्षामुळेच होतात. महिलांनी सणासुदीच्या काळात दागिन्यांचा मोह टाळून स्वत:ची व कुटुंबाची होणारी आर्थिक व मानसिक हानी टाळावी. आपला पती हाच मोठा सौभाग्याचा दागिना आहे. मौल्यवान वस्तू, दागिन्यांपेक्षा मनुष्याचे जीवन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांनी केले.

कजबेवस्ती येथील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी शोभा दातीर, शैला बारगळ, आश्विनी शेंडगे, ममता सोलार, प्रगती कुटे, वृषाली शिरसाठ, पुनम भोर, उषा शेंडगे, सौ.खांदवे, भंडारी, निशांत दातीर, कुणाल जायकर, प्रा.विष्णू बारगळ, बाळासाहेब शेंडगे, दत्तात्रय सोलाट, विशाल गुंजाळ, बाळासाहेब थोरात, गणेश भोर, अमोल काळे, आदिनाथ बर्डे, युवराज कजबे, संदिप क्षीरसागर, अंकुश गावडे, जगदीप सानप, इंजि.डि.आर.शेंडगे, स्वप्नील जतकर, योगेश कुलकर्णी, जयराम काळे, हरिष बराटे, रविंद्र लोखंडे, प्रा.सुजित कुमावत आदि उपस्थित होते. गडकरी म्हणाल्या, पोलिस व नागरिक यांच्या संवादातून अनेक गंभीर गुन्ह्यांचे उकल होत असते. सूत्रसंचालन माजी प्राचार्य खांदवे यांनी, तर आभार हेमंत कुटे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...