आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझी एकही सहकारी संस्था नाहीये तरीही मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सहकार खात्याची जबाबदारी टाकली आहे. राज्यातील पतसंस्थांच्या प्रलंबित प्रश्न व अडचणी समजून घेतले आहेत. काका कोयटे यांनी मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे. यासाठी आधी संभाजीनगरमध्ये व नंतर अधिकाऱ्यांसह मंत्रालयात बैठक घेऊ, असे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले.
सहकार मंत्री सावे प्रथमच नगरला आल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी संघ व नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी पतसंस्था समस्या निराकारण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची आंतरराष्ट्रीय एशियन कॉन्फिडरेशन ऑफ क्रेडिट युनियनच्या कोषाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल मंत्री सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी फेडरेशनचे शांतीलाल शिंगी, सुदर्शन भालेराव, गोविंदप्रसाद अग्रवाल, अंजली पाटील,सुरेश वाबळे, वसंत लोढा, विठ्ठल अभंग, पुखराज पिपाडा, शिवाजीराव कपाळे, रामसुख मंत्री, सबाजीराव गायकवाड, कडूभाऊ काळे, सुरेखा लवांडे, प्रा.भानुदास बेरड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक वसंत लोढा यांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.