आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आजी-माजी महसूलमंत्र्यांमध्ये गौण संघर्ष उफाळला

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील विकास कामांना खडी मिळत नसल्याच्या तक्रारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, निलेश लंके, संग्राम जगताप यांनी थेट जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केल्यानंतर दक्षिण व उत्तर जिल्ह्याचे राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. त्यातच महसूल विभागाने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघ असलेल्या संगमनेर तालुक्यातील ५७ खडी क्रेशर चालकांना ७६५ कोटींच्या दंडाच्या नोटीसा पाठवल्यानंतर विखे विरुद्ध थोरात संघर्ष पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान वाळू उपसा आणि गौण खनिज यावर कारवाईच्या नावाखाली राजकीय कारवाया केल्या जात आहे. कोट्यावधी रुपयांचे खोटे दंड ठोठावून, खोटे गुन्हे दाखल करून उद्योग व्यवसायिकांना वेठीस धरले जात आहे. असा गंभीर आरोप माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी केला आहे.

विखे -थोरात हा संघर्ष नवीन नसला तरी आता गौन खनिज व खडी क्रेशरच्या मुद्द्यावरून विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. महाविकास आघाडीच्या कालावधीत महसूल मंत्रीपद हे काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे होते.

थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ हा विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शेजारी आहे. थोरात -विखे यांची गावे देखील एकमेकांच्या मतदारसंघात आहेत. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना विकास कामांना खडी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. हे प्रकरण ताजे असतानाच महसूल विभागाकडून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातील ७५ खडी क्रेशर चालकांना ८६५ कोटींच्या दंडाच्या नोटिसा पाठवल्या आहेत. महसूल विभाग हा विखे यांच्याकडे आहे.

नोटिसांनंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून, विखे -थोरात यांच्या संघर्षात महसूल विभागाची मात्र डोकेदुखी वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे विकास कामे सुरू होती. आज ती कामेही ठप्प झाली आहेत.वाळू उपसा आणि गौण खनिज यावर कारवाईच्या नावाखाली राजकीय कारवाया केल्या जात आहे.

कोट्यावधी रुपयांचे खोटे दंड ठोठावून, खोटे गुन्हे दाखल करून उद्योग व्यवसायिकांना वेठीस धरले जात आहे.असा आरोप थोरात यांनी केला आहे.अहमदनगर जिल्हा हा समृद्ध राजकीय परंपरा असलेला जिल्हा आहे. सत्ताधाऱ्यांकडून सर्वच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय कारवाया या येथील परंपरेला छेद देणाऱ्या आहे. राजकारण करण्याच्या नादात संपूर्ण जिल्हाच काही मंडळींनी वेठीस धरला आहे. असे थोरात यांनी सांगितले.

आमदार थोरात, लंकेंचे तालुके विखे पितापुत्रांच्या रडारवर
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघांसह राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या मतदार संघात देखील महसूलकडून गौण विरोधात कारवाया सुरु आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून लंके उमेदवार असून शकतात, असा कयास बांधून राजकीय गणिते सुरु झाली आहेत. त्यातून या दोन तालुक्यांवर विखे पितापुत्रांनी लक्ष केंद्रित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...