आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार‎:अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार‎

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदिवासी समाजातील‎ मुलींसाठीच्या शासकीय वसतिगृहात‎ राहत असलेल्या एका अल्पवयीन‎ मुलीला पळवून नेऊन तिच्यावर‎ अत्याचार केल्याची घटना समोर आली‎ आहे. अत्याचार करणाऱ्या तरुणाला‎ तोफखाना पोलिसांनी लोणावळा (जि.‎ पुणे) येथून अटक केली असून पीडित‎ अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.‎ विश्‍वनाथ चिमाजी गडदे (वय ३२ रा.‎ गडदे आखाडा, राहुरी) असे अटक‎ केलेल्या तरूणाचे नाव आहे.

त्याला‎ न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस‎ कोठडी दिली आहे. वसतिगृहात‎ राहणारी राहुरी तालुक्यातील‎ अल्पवयीन मुलगी २ फेब्रुवारीपासून‎ बेपत्ता होती. याप्रकरणी तोफखाना‎ पोलिस ठाण्यात फिर्याद गुन्हा दाखल‎ झाला होता. निरीक्षक ज्योती गडकरी‎ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक‎ निरीक्षक जे. सी. मुजावर हे तपास‎ करत आहेत. त्यांच्यासह अंमलदार‎ प्रदीप बडे यांनी पीडित मुलीला पळवून‎ नेणार्‍या गडदे याचे लोकेशन काढून‎ त्याला लोणावळा येथून ताब्यात घेतले.‎ त्यानंतर पीडित मुलीच्या जबाबावरून‎ त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात‎ आला.‎

बातम्या आणखी आहेत...