आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचावे ते नवलच:बंगळुरूहून आलेल्या उंदराने शिर्डीत 3 तास रोखले विमान, अखेर सायंकाळी 6.15 वाजता उड्डाण

नवनाथ दिघे |शिर्डी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू-शिर्डी विमानातील उंदराने तब्बल ३ तास विमान उड्डाण रोखून धरले. इंडिगो बोइंगसह सुरक्षा विभागातील ३० ते ३५ कर्मचाऱ्यांनी तीन ते साडेतीन तास शोधमोहीम राबवल्यानंतर सायंकाळी ५.५० वाजता हे महाशय सापडले. त्यानंतर शिर्डीहून पुन्हा बंगळुरूकडे जाणारे इंडिगो बोइंग हे विमान सायंकाळी ६.१५ वाजता बंगळुरूच्या दिशेने झेपावले.

बंगळुरू येथून शिर्डीकडे येणारे इंडिगो बोइंग विमान शिर्डी विमानतळावर मंगळवारी दुपारी २ वाजता लँड झाले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप उतरून मार्गस्थ झाले. दरम्यान, हवाई सुंदरींनी विमानातील बैठक व्यवस्थेची तपासणी सुरू केली. या वेळी एका हवाई सुंदरीस विमानात उंदीर दिसला. तिने याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. यानंतर उंदराची शोधमोहीम सुरू झाली. जवळपास साडेतीन तासांच्या शोधमोहिमेनंतर उंदीर शोधून काढण्यात आला अन् विमान मार्गस्थ झाले.

बातम्या आणखी आहेत...