आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न मार्गी:गंगा उद्यानातही म्युझिकल फाउंटनची होणार उभारणी;आमदार संग्राम जगताप यांची माहिती

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर विकासाचे नियोजन तात्पुरते नसून, कायम स्वरुपाचे आहे. टीमवर्क असल्यामुळेच शहरातील विकासाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. मनपाच्या गंगा उद्यानातही म्युझिकल फाउंटनचे काम लवकरच सुरू होणार आहे, त्यामुळे शहरात दोन म्युझिकल फाउंटन कार्यरत होतील, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.सारसनगर येथील रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला.

यावेळी ते बोलत होते. उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, निखील वारे आदी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, नागरिकांसाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. रस्त्यांची कामे हाती घेतली असून टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील. अमृत भुयारी गटारी योजनेच्या कामानंतर सीना नदीचे प्रदूषण थांबेल. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल. शहरातील युवकांना खेळाची गोडी लागावी, खेळाडूंना सुविधा देण्यासाठी क्रीडा संकुलाचे कामही सुरू झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...