आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुखापत:तक्रारी केल्याच्या संशयावरून पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण ; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरिष्ठांकडे तक्रारी केल्याच्या संशयातून तीन पोलिसांनी सहकारी पोलिस कर्मचार्‍याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. नगर रेल्वेस्थानकात ही घटना घडली. या मारहाणीत रवींद्र भानुदास देशमुख (रा. सारसनगर, नगर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रवींद्र देशमुख (रा.एकदंत कॉलनी, सारसनगर) हे सुमारे एक महिन्यापासून नगर येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. देशमुख हे मंगळवारी रात्री नऊ वाजता ड्युटीवर होते. त्यावेळेस सहकारी पोलिस कर्मचारी जगताप याने काही कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. पोलिस हवालदार मनोज साळवे हातात लाकडी दांडके घेऊन आला. खासगी ड्रेसवर असलेला पोलिस कर्मचारी हर्षल तोरणे हा तेथे आला.

आमच्या तक्रारी वरिष्ठांना करतो का, असे म्हणून दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. तिघांनी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीचे मोबाईलमध्ये शुटिंग करण्यास सुरूवात केल्यावर त्यांनी मोबाईल हिसकावून घेतला. या मारहाणीत डाव्या हाताची बोटे आणि उजव्या हाताला दुखापत झाली. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. देशमुख यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी जगताप, मनोज साळवे, हर्षल तोरणे या तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...