आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रवदन दोडिया म्‍हणाले:पोस्टमन म्हणजे प्रामाणिकपणे काम करणारा लोकसेवक

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
पोस्टमन जगन्नाथ वाघमारे यांचा सत्कार करताना पोस्ट अधिकारी, कर्मचारी. - Divya Marathi
पोस्टमन जगन्नाथ वाघमारे यांचा सत्कार करताना पोस्ट अधिकारी, कर्मचारी.

देशातील जनसामान्यांचे विश्वासाचे आणि हक्काचे ठिकाण म्हणजे पोस्ट ऑफिस. आणि त्या कार्यालयात काम करणारा पोस्टमन हा फक्त कामापुरता संपर्क न ठेवता प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा सदस्य म्हणजे पोस्टमन. आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून जनतेशी भावनिक नाते तयार करणारा पोस्टमन हा खरा लोकसेवकच असल्याचे मत सावळी विहीर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. इंद्रवदन दोडिया यांनी केले.

शिर्डी टपाल कार्यालयातील पोस्टमन जगन्नाथ वाघमारे यांचा टपाल कर्मचारी आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डी टपाल कार्यालयाचे पोस्ट मास्तर राजेश नेतनकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. इंद्रवदन दोडिया होते. व्यासपीठावर सवाळीविहिरचे माजी सरपंच अशोक आगलावे, सवाळीविहिर खुर्दचे सरपंच अशोक जमधडे उपस्थित होते. यावेळी मान्यवर व उपस्थित टपाल कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या वतीने टपाल खात्यात ४० वर्षे पोस्टमन म्हणून सेवा देणारे जगन्नाथ वाघमारे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दोडिया म्हणाले, टपाल खाते आता झपाट्याने बदल घडवून आणत असून लोकांचा विश्वास जिंकत आहे. पोस्ट ऑफिसच्या लोक कल्याणकारी बचत योजनांचा गाव ते शहर भागातील लोकांना फायदा घेताना दिसत असून टपाल खात्याचे हे यश आहे. यावेळी पत्रकार नितीन मिराने, रामभाऊ लोंढे, विजय बाभुळके, अभिजित कर्णावत, अर्चना पाथरकर, संदीप रक्ताते, संजय वाघमारे, अक्षय जोशी, विजय सोनवणे, लुखमन तडवी, मच्छिंद्र औताडे, देविदास भातकुटे, कैलास कोळगे, निवृत्ती घोटेकर, आनंदा धनवटे, मेलवर्षर मोरे, संजय ढेपले, पोस्टल सोसायटीचे चेअरमन पगारे, विजय वाघमारे, सोपान गायकवाड, दिलीप बाठिया, सुंदर वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वाघमारे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...