आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्याने घेतला डिग्रस येथील महिलेचा जीव

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-मनमाड रस्त्यावरील खड्डा चुकवत असताना दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाली आहे. नगर-मनमाड राज्य महामार्गावर गुरुवारी सकाळी अपघाताची ही घटना घडली. तालुक्यातील डिग्रस येथील रहिवाशी राधाकृष्ण तागड हे पत्नी मिराबाई तागड यांच्या समवेत मोटरसायकलवर राहुरी दिशेला जात होते. डिग्रस फाट्याजवळ मोटरसाइकल खड्ड्यात आदळल्याने मिराबाई पाठीमागच्या बाजुने येणाऱ्या कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाल्या. या घटनेत राधाकृष्ण तागड यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी नगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.

मृत मिराबाई तागड यांच्या पश्चात ३ मुली, १ मुलगा, नवरा, सासू असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. चार दिवसांपूर्वी राहुरी येथील अजय बोरूडे या २८ वर्षीय तरुणाचा नगर-मनमाड राज्य महामार्गाच्या रस्त्यावरील खड्डा दून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा नगर- मनमाड रस्त्याने मिराबाई तागड या ३८ वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नगर-मनमाड रस्त्याची अत्यंत धोकादायक अवस्था झाली आहे. या कामासाठी टक्केवारी मागीतली गेल्याने संबंधित ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत काम सोडून दिल्याचा आरोप होत आहे. मृत्युचा सापळा बनलेल्या नगर-मनमाड राज्य महामार्गावरील रस्त्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार हा संतप्त सवाल प्रवाशांकडुन केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...