आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चातुर्मास:श्रीरामपुरात 150 जैन तपस्वींची शोभायात्रा उत्साहात

श्रीरामपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन स्थानकामध्ये चातुर्मास निमित्त झालेल्या नवरंगी तपामध्ये सहभागी झालेल्या १५० तपस्वींची भव्य दिव्य शोभायात्रा (वरघोडा) श्रीरामपुरात काढण्यात आली होती. प्रज्ञाज्योती विश्‍वदर्शनाजी व विद्याभिलाषी तिलकदर्शनाजी यांनी पर्यूषण पर्व काळापूर्वी नवरंगी तपाचे आवाहन भाविकांना केले होते. जैन धर्मीय भाविकांकडून प्रथमच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ७ वर्षांपासून ते ८४ वयाचे ज्येष्ठांपर्यंत नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार व तीन निरंकार उपवास केेले. चातुर्मासात अनेक तपस्वींनी तपस्या केली आहे. शहरात सकाळीच ९ वाजता तपस्वींची शोभायात्रा निघाली. सुमारे वीस सजवलेल्या बग्ग्या, जीप व पाच ट्रॅक्टर यामध्ये १५० तपस्वींना फेटा बांधुन बसविण्यात आलेले होते.

मिरवणुकीत तपस्वीच्या जयजय काराच्या, आचार्य आनंदऋषिजी व भगवान महावीरांच्या जयजयकाराने श्रीरामपुर दुमदमुन गेले होते.दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल, उपाध्यक्ष अॅड. सुहास चुडिवाल, अनिल पांडे सर्व विश्‍वस्त व कार्येकर्ते तसेच संभवनाथ जैन मंदिराचे अध्यक्ष शैलेशभाई बाबरिया, अमित गांधीसह सर्व विश्‍वस्त समाज बंधु व भगिनी सहभागी झाले होते. यावेळी विश्‍वदर्शनाजी म.सा. म्हणाल्या तपाने आत्मशुध्दी होऊन आत्मकल्याण होते. आत्मबळ वाढते, प्रत्येकाने जीवनांत तपश्‍चर्या करावी असे आवाहन प्रवचनातुन केले. प्रास्ताविक ज्येष्ठ सदस्य रमेश कोठारी यांनी केले. सुत्रसंचालन दीपक संघवी यांनी केले. यावेळी पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, जालना आदि महाराष्ट्रातून जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...