आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा फटका:वांबोरीत वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका; मंत्री तनपुरे यांची पाहणी ; नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी

राहुरी शहर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वांबोरी परिसराला शनिवारी जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा फटका बसला. यामध्ये अनेक विजेचे खांब पडले. तसेच एक गाईचा मृत्यू झाला व काही शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे उडाली आहेत. या सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी वांबोरी येथे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आले असता त्यांनी या सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सरपंच नितीन बाफना, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक भारत तारडे, ब्राह्मणीचे सरपंच डॉ. राजेंद्र बानकर, विठ्ठल मोकाटे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, महावितरण उपअभियंता धिरज गायकवाड, महावितरणचे अभियंता तान्हाजी भोर, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, बाबासाहेब तोडमल, तुषार मोरे, गोरक्षनाथ ढवळे, शंकरराव मोरे, संभाजी गडाख, दीपक गडाख, अशोक पटारे, बापुसाहेब गडाख, ईश्वर कुसमुडे, पोपट देवकर, कुलदिप पाटील, विलास शिरसाठ आदी उपस्थित होते.

मान्सूनपूर्व पावसाने वांबोरी कुक्कडवेढे भागात झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले असून त्या नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त निधी मिळवून दिला जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून नगर वांबोरी रस्त्याचे काम प्रलंबीत होते. त्यासाठी ५ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अवघे एक किलोमीटरचे काम बाकी असताना त्याबाबतच्या अडचणी बाबत संबंधित अधिकारी वन खात्याचे अधिकारी यांची बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल, असे मंत्री तनपुरे म्हणाले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भिटे म्हणाले, वांबोरी परिसरावर मंत्री तनपुरे यांनी विकास कामांच्या माध्यमातून कायमच झुकते माप दिले असून परिसरामध्ये पाणी योजना, अनेक डांबरी रस्ते, विजेचे रोहित्रे त्याचबरोबर सौर ऊर्जा प्रकल्प नगर -वांबोरी रस्ता मजबुती अशी कामे मंत्री तनपुरे यांनी मार्गी लावली. गडाख वस्ती येथील नागरिकांनी स्मशान भूमीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...