आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • A Record Donation Of Four Crores At Sai's Feet In Just Three Days; 50 Thousand Pilgrims Attended Shirdi Through 150 Palanquins From All Over The Country

भक्ती:अवघ्या तीन दिवसांतच साईंच्या चरणी चार कोटींचे विक्रमी दान ; 50 हजार पदयात्रींची शिर्डीत हजेरी

शिर्डी / नवनाथ दिघे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामनवमी उत्सवानिमित्त २९ ते ३१ मार्च या तीन दिवसांत श्रद्धा आणि सबुरीबरोबरच विश्वाला ‘सबका मलिक एक’ हा संदेश देणाऱ्या शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी ३ लाखापेक्षा अधिक भाविक लीन झाले. या तीन दिवसांत साईंच्या झोळीत तब्बल ४ कोटी ९ लाख ३९ हजारांचे दान अर्पण केले आहे.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले की, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या शिर्डीतील साईबाबांचा रामनवमी उत्सव प्रचंड उत्साहात पार पडला. या उत्सवकाळात देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत आल्याने शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती.

साई संस्थानचे भक्तनिवास, हॉटेल, लॉज हाऊसफुल्ल झाले होते. देशाच्या विविध भागांतून १५० हून अधिक साई पालख्यांद्वारे ५० हजार पदयात्री शिर्डीत दाखल झाले होते. या पदयात्रींची साई संस्थानच्या धर्मशाळेत नाममात्र दरात निवास व्यवस्था केली. भक्तनिवासाचा ४३ हजार भाविकांनी लाभ घेतला. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन साई संस्थानतर्फे साई मंदिर परिसर व लगतच्या मार्गावर सावलीसाठी विविध ठिकाणी मंडप उभारले होते. साई संस्थानच्या प्रसादालयात ३ दिवसांत २ लाख ८५ हजार ४१३ भाविकांनी प्रसाद भोजनाचा आनंद घेतला.

दानातून साईभक्तांना सुविधा व गरिबांना सेवा दिली जाते देश-विदेशात कोट्यवधी साईभक्त असून त्यांनी साईबाबांना दिलेल्या दानातून साईभक्तांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच भोजन प्रसादालय, गोरगरिबांसाठी अत्याधुनिक रुग्णालये, शैक्षणिक कॉम्प्लेक्स आदींसाठी मोठ्या प्रमाणावर दानातून खर्च करण्यात येतो. सुकर दर्शनासाठी दर्शन कॉम्प्लेक्सची निर्मिती, विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक इमारत उभारली जाईल. - राहुल जाधव, सीईओ, साई संस्थान, शिर्डी.