आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंमत:चांदेकासारे येथील गायीला तब्बल 1 लाख 31 हजारांची विक्रमी किंमत

कोपरगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चांदेकसारे येथील संतोष सुभाष लांडगे यांच्या पहिलारू कालवडीला तब्बल १ लाख ३१ हजार रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली आहे. हा कोपरगाव तालुक्यातील गायीला मिळालेल्या किमंतीचा विक्रम झाला आहे. नांदूर मधमेश्वर येथील सोमनाथ कारभारी कहाने यांनी ही कालवड विकत घेतली. विक्री झालेल्या कालवडीची ढोल ताशे यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

फटाक्यांची आतषबाजी करत ग्रामस्थांनाही फेटे बांधण्यात आले. यावेळी माजी सरपंच केशवराव होन, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक डॉ. गोरक्षनाथ रोकडे, जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक जयद्रथ होन, सुभाष लांडगे,साहेबराव लांडगे, बाळासाहेब लांडगे, ग्रामसेवक प्रल्हाद सुकेकर, शरद होन, अण्णासाहेब होन, किशोर लांडगे, धर्मा दहे, डॉ. देविदास होन, डॉ. मनोज अनारसे, सौरभ रोकडे, राहुल कहाने, विशाल कहाने, प्रदीप कहाने उपस्थित होते. या कालवडीची आई वारल्यानंतर एक दिवसाची कालवड दुसऱ्या गाईचे दूध पाजून व औषध उपचार करून सांभाळली. चांगल्या शेतकऱ्यांनी ही गाय विकत घेतल्याने आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया लांडगे यांनी दिली. एचएफ हरियाणा पंजाब जातीची ही कालवड आहे. किमान ३० ते ३५ लिटर दूध देण्याची अपेक्षा आहे. कालवड खरेदी करताना हौस व कालवडीच्या रूपाने भारावून गेलो असल्याचे कहाने यांनी सांगितले. कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत १ लाख ११हजार व १ लाख २१ रुपये इतका गाय खरेदीचा विक्रम झालेला होता. मात्र या विक्रमाला लांडगे यांच्या गायीने मागे टाकत जास्त किंमत येण्याचा विक्रम आपल्या नावावर केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...