आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:स्कूल बस व छोटा हत्तीत सामोरासमोर धडक, 12 महिलांसह चालक जखमी

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथून मांडवगण फराटा येथे कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलांच्या टाटा कंपनीच्या छोटा हत्ती या वाहनाला संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरी माघारी येताना भीषण अपघात होऊन यात १२ महिलांसह चालक गंभीर जखमी झाला. जखमींना काष्टी येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.

काष्टी परिसरातील गजानन वाडी येथील बारा महिला कापूस वेचण्यासाठी मांडवगण फराटा परिसरात गेल्या होत्या. शुक्रवारी काम संपल्यानंतर काष्टी येथे टाटा कंपनीच्या एमएच १२ जी. टी ६४५५ या छोटा हत्ती वाहनाने माघारी परतत असताना शिरूर तालुक्यातील टाकळी परिसरात काष्टीकडून मांडवगण फराट्याकडे भरधाव स्कूल बसने एमएच ४२ एएफ ४०२५ ने छोटा हत्तीला सामोरा समोर जोराची धडक दिली. या अपघातात छोटा हत्तीचा चालक सचिन शहाजी विघ्ने, वय १९ याचे दोन्ही पाय गुढग्याजवळ फ्रॅक्चर झाले. रतन रासकर, सविता शिंदे, अरुणा कोकाटे, ज्योती सकट, अनिता पोकळे, आशा कोकाटे, वर्षा लोखंडे, स्वाती चौरे, छाया राऊत, प्रिया चौधरी, अनिता दतीर तसेच अर्चना माने या बारा महिला जखमी झाल्या. यात आशा कोकाटे आणि अरुणा कोकाटे या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर स्कूल बसचा चालक हा फरार झाला. अपघातातील जखामी महिलांना शिरूर पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे यांनी आपल्या वाहनातून काष्टी येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...