आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पातून कोणाला काय गवसले, सरकारचे आर्थिक धोरण काय व भविष्यातील वाटचाल कशी असेल असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात.
या प्रश्नांची उत्तरे थेट अभ्यासक, तज्ञांकडून मिळण्यासाठी नगरमध्ये प्रथमच बजेटवर बोलू काही या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी, ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता एमआयडीसी येथील चिंतामणी आर्ट गॅलरीत हा परिसंवाद होईल. या कार्यक्रमात सीए,आयपी अजय मुथा हे प्रमुख वक्ते आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.