आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानधनाची प्रतीक्षा:इष्टांकाच्या घोळात ज्येष्ठ कलावंत मानधनाच्या प्रतीक्षेत

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार ज्येष्ठ कलावंतांना दरमहा मानदन देण्याची योजना राबवली जाते. अहमदनगर जिल्ह्याला दरवर्षी केवळ १०० कलावंतांनाच मानधन सुरू करण्याची मर्यादा (इष्टांक) घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजही ८०० कलावंत जिल्हा परिषदेचे उंबरठे झीजवत असून त्यांना लाभ मिळालेला नाही.पन्नास वर्षापेक्षा अधिक वय असलेला कलावंत अथवा साहित्यिक, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 48000, कला साहित्य क्षेत्रात पंधरा ते वीस कामगिरी करणाऱ्या वृद्ध साहित्यिक अथवा कलावंतास दरमहा मानधन दिले जाते. जर कलावंत राष्ट्रीय असेल तर दरमहा ३ हजार १५०, राज्यस्तरीय कलावंतासाठी २ हजार ७०० तसेच स्थानिक कलावंत असेल तर २ हजार २५० रुपये मानधन दिले जाते.

तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जुलै २०२१ मध्ये या योजनेच्या कलावंताच्या निवडीसाठी समिती गठित केली होती. प्रकाश जंजिरे या समितीचे अध्यक्ष असून वर्षात एकदाच या समितीची बैठक होते. या योजनेसाठी दरवर्षी ७०० ते ८०० प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे दाखल होतात. जिल्ह्यासाठी केवळ शंभर कलावंतांचीच निवड एका वर्षात करता येते. त्यामुळे अनेक जण पात्र असूनही त्यांना पुढील वर्षीच्या प्रतीक्षा यादीत टाकले जाते.

वर्षनिहाय दाखल प्रस्ताव व निवड
२०२० मध्ये ५८२ कलावंतांनी मानधनासाठी प्रस्ताव दिले होते त्यापैकी शंभर कलावंतांची निवड झाली. २०२१-२०२२ मध्ये ९२७ प्रस्ताव असताना इष्टांक मर्यादेच्या अटीमुळे केवळ शंभर प्रस्ताव मंजूर झाले. स्थितीत सुमारे ८०० कलावंत प्रतिक्षा यादीत आहेत.

२०१८ पासून यांनी झिजवले उंबरठे
जिल्हा परिषदेत मानधनासाठी नगर तालुक्यातील मेहेकरी येथील महादेव पालवे हे कलावंत २०१८पासून हेलपाटे मारत आहेत. त्यांचा अर्ज एक ऑक्टोबर 2018 चा असून त्यावर दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचे शिफारस पत्र देखील आहे. तथापि, मानधन मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...