आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकामाची पहिली तयारी:उत्पादन शुल्कला मिळणार स्वतंत्र इमारत

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षात नगरच्या उत्पादन शुल्क विभागाला स्वतंत्र इमारत मिळणार आहे. इमारतीच्या बांधकामाची पहिली तयारी सुरू झाली असून, त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे.

नगरचे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय माळीवाडा परिसरात होते. ही इमारती जुन्या पद्धतीने बांधण्यात आलेली होती. या इमारतीची मोठी दुरावस्था झाल्याने उत्पादन शुल्क विभागाने नव्या इमारतीसाठी प्रस्ताव सादर केला होता. या इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे. नव्या वर्षात नवी वस्तू जिल्हा उत्पादन शुल्क विभागाला मिळणार आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...