आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:देवगड ते देवगड फाटा मार्गावर‎ अपघातांची मालिका सुरुच‎

कुकाणे‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र देवगड संस्थान ते देवगड‎ फाटा या रस्त्याचे साडेतीन‎ किलोमीटरचे डांबरीकरणाचे काम‎ दहा मीटर रुंदीकरण पूर्ण झाले आहे.‎ साडेतीन किलोमीटर झालेल्या‎ कामाचे रस्त्याच्या सुरक्षिततेच्या‎ दृष्टीने अपघात होऊ नये म्हणून रोड‎ फर्निचर बाबतीतही वरिष्ठांनी सूचना‎ देणे गरजेचे आहे. गार्ड स्टोन,‎ किलोमीटर स्टोन, थर्माप्लास्ट पट्टे,‎ साईन बोर्ड, क्रॉस बॅरियर,रस्त्यांच्या‎ गावाची नावे,वळण रस्ता,अरुंद‎ पुल,पुढे शाळा आहे इत्यादी न‎ बसवल्यामुळे नवीन रस्ता‎ झाल्यापासून रोजच अपघातांची‎ मालिका सुरू आहे.‎

रस्त्याच्या कडेला पाणी वाहून‎ जाण्यासाठी बांधकाम विभागाच्या‎ वतीने साईड गटार करणे बाकी‎ आहे, साईड शोल्डर वर मुरूम‎ भरणे बाकी आहे,परंतु काही‎ शेतकऱ्यांनी विनापरवानगी‎ असुरक्षितरित्या डांबरी रस्त्याला‎ चिटकूनच खूप जास्त खोल गटर‎ खोदकाम केल्यामुळे चार चाकी‎ सारखे मोठे वाहनेही नाली मध्ये‎ जाऊन अडकत आहेत,जीवित‎ हानी जरी झाली नसेल तरी मोठ्या‎ प्रमाणावर गाड्यांचे नुकसान होत‎ आहे याकरिता संबंधित ठेकेदार व‎ बांधकाम विभागातील‎ अधिकाऱ्यांनी अपघात स्थळ‎ निरीक्षण करत कायमस्वरूपी‎ उपाययोजना करणे गरजेचे आहे,या‎ कामी पोलीस प्रशासनाची ही मदत‎ घ्यायला पाहिजे जेणेकरून अपघात‎ घडणार नाही, देवगड कडून‎ रस्त्याच्या सुरुवातीची १४ मीटर रुंद‎ व तीनशे मीटर लांबीसाठी चौपदरी‎ रस्ता तयार केला आहे.

ही जागा‎ मुरमे गावातील असल्याने परिसरात‎ शाळा,मंदिर, ग्रामपंचायत‎ कार्यालय,समाज मंदिर, छोटी मोठी‎ दुकाने असल्या कारणाने इथे रोड‎ डिवाइडरही आवश्यक आहे,‎ मागील आठ दिवसात आठ ते दहा‎ चार चाकी कार रस्त्याच्या खाली‎ रस्त्याचा अंदाज न आल्याने च्या‎ खाली घसरल्या, १ डिसेंबर ते ८‎ डिसेंबर देवगडला श्री दत्त‎ जन्मोत्सव सोहळा आहे, यावेळी‎ मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त‎ दर्शनासाठी येणार आहेत. त्या‎ अनुषंगाने उत्सवा अगोदरच‎ कायमस्वरूपी उपाययोजना करणे‎ गरजेचे आहे. ही कामे लवकरात‎ लवकर पूर्ण करावी अशी मागणी‎ परिसरातील नागरिक,शेतकरी,‎ सामाजिक कार्यकर्ते,भाविक‎ भक्तांच्या वतीने करण्यात येत आहे‎.

बातम्या आणखी आहेत...