आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिकेची शुक्रवारी महासभा:सावेडी स्मशानभूमीसाठी जागेचा प्रस्ताव अजेंड्यावर

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. यात सावेडी भागात दफनभूमी व स्मशानभूमी उपलब्ध करुन देण्यासाठी भूसंपादन करण्याचा विषय घेण्यात आला आहे.

सभेत जिल्हा नियोजन समितीमार्फत अग्निशमन विभागाकरीता लागणारी साधन सामुग्री खरेदीसाठी निधी मिळणे, स्थायी समितीच्या शिफारसीनुसार पुनर्विनियोजन अंदाजपत्रक तरतुदीला मंजुरी देणे, १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून कामे मंजूर करणे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रस्तावित विकास कामांना तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मनपाने भरलेली १२.५० लाख रुपये रक्कम मनपाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव देणे, ७० व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेस निधी देणे, सावेडी भागात दफनभूमी व स्मशानभूमी उपलब्ध करुन देण्यासाठी भूसंपादन करणे आदी विषय अजेंड्यावर घेण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...