आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव योजना‎:पीएनजी तर्फे घडणावळीवर‎ विशेष उत्सव योजना‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसरा-दिवाळीचे औचित्य साधून पीएनजी सन्स (पु.‎ ना. गाडगीळ आणि सन्स लि.) ने दागिन्यांच्या‎ घडणावळीवर विशेष सवलत योजना जाहीर केली‎ आहे. सोन्याच्या दागिन्याच्या घडणावळीवर ५०‎ टक्क्यांपर्यंत, हिऱ्यांच्या दागिन्याच्या घडणावळीवर‎ १०० टक्के आणि चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर‎ ५० टक्क्यांपर्यंत सवलत ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत‎ मिळणार आहे.‎ पीएनजी सन्सचे सीएफओ व मार्केटिंग प्रमुख‎ आदित्य मोडक म्हणाले, दोन वर्षांनंतर आपण‎ बंधनमुक्त दसरा-दिवाळी साजरे करणार आहोत.‎ त्यामुळे ग्राहकांना आमच्याकडून भेट म्हणून या वर्षी‎ दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष योजना जाहीर‎ केली आहे.

आमच्या दालनांत प्रत्येकाला साजेसे‎ असे अनेक प्रकारचे म्हणजे पारंपरिक ते डिझायनर,‎ डेलिकेट दागिने व विविध कलेक्शन आहेत. हिऱ्याचे‎ दागिने १५ हजार रुपयांपासून उपलब्ध असल्याने या‎ दागिन्याची हौस प्रत्येकाला पूर्ण करता येऊ शकेल.”‎ गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंचे दर‎ आकर्षक पातळीवर आले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा‎ सोने-चांदी धातूतील गुंतवणुकीचा व दागिने खरेदीचा‎ कल वाढलेला दिसत आहे. सण-उत्सवात तो‎ आणखी वाढेल, अशी खात्री आहे, असे मोडक‎ म्हणाले. पुण्यात सातारा रोड, औंध, हॅपी‎ कॉलनी-कोथरूड, सिंहगड रोड, चिंचवड आणि‎ भोसरी, तसेच अमरावती, बदलापूर, बीड, धुळे,‎ डोंबिवली, जळगाव, नाशिक, नाशिक रोड,‎ नारायणगाव, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, पंढरपूर,‎ फलटण, सातारा, संगमनेर, शिर्डी, शिरूर, सोलापूर,‎ कलबुर्गी (कर्नाटक), मुंबई, वडोदरा (गुजरात)‎ आणि वर्धा येथील दालनांत ही योजना उपलब्ध‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...