आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन ठार:भरधाव जाणाऱ्या टिप्परची दुचाकीला धडक; तीन ठार ; मढ फाट्याजवळील घटना

धाड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिट्टी घेवून भरधाव जाणाऱ्या टिप्परने समोरून येत असलेल्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. तर या अपघातात जखमी झालेल्या पत्नीसह दोन भाच्यांना धाड येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले असता तपासणी करून डॉक्टरांनी दोन्ही भाच्यांना मृत घोषित केले. तर अपघातात जखमी झालेल्या महिलेवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बुलडाणा-अजिंठा मार्गावरील मढ फाट्याजवळ असलेल्या महानुभाव आश्रमाजवळ घडली. औरंगाबाद जिल्ह्यातील पानवडोद येथील ज्ञानेश्वर गणपत सुरुशे वय ४० हे आपली पत्नी नीता सुरूशे वय ३०, भाचा अमरदिप ज्ञानेश्वर जाधव वय १५ रा. शिवणी टाका व शंतनू आनंदा वैद्य वय ९ रा. कोलवड यांना घेऊन एम.एच. २०/ सि.डी / ७३० या क्रमांकाच्या दुचाकीने बुलडाण्यावरून आपल्या गावी पानवडोद येथे परत जात होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास मढ फाट्यावरील महानुभाव आश्रमाजवळ त्यांची दुचाकी येताच त्यांच्या दुचाकीला समोरून गिट्टी घेवून भरधाव येणाऱ्या एम.एच.२८ / ए.बी / ७५९४ या क्रमांकाच्या टिपरने समोरासमोर जबर धडक दिली. या अपघातामध्ये ज्ञानेश्वर सुरोशे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी नीता सुरूशे व सोबत असलेले दोन भाचे गंभीर जखमी झाले होते. हा अपघात घडताच टिपर चालकाने घटना स्थळावरुन पलायन केले. अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी झालेल्या महिलेसह दोन भाच्यांना येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु तपासणी करून डॉक्टरांनी दोन्ही भाच्यांना मृत घोषीत केले. तर जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर ज्ञानेश्वर सुरुशे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात हलविला. पुढील तपास धाड पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...