आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांमध्ये‎ शोककळा:ऊस तोडणी कामगाराचा‎ बैलाच्या धडकेत मृत्यू‎

कोपरगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील‎ कोळपेवाडी येथील कर्मवीर‎ शंकरराव काळे सहकारी साखर‎ कारखाना बैलगाडी यार्डात बैलाने‎ मारलेल्या धडकेत ऊसतोडणी‎ कामगाराचा मृत्यू झाला. दामू रभा‎ सापनर (रा. मिरगाव, ता. सिन्नर)‎ असे मृत कामगाराचे नाव आहे.‎ सापनर यांना त्यांच्याच बैलाने‎ सोमवारी (ता. १३) सायंकाळी‎ साडेसहाच्या सुमारास धडक दिली.‎

त्यात गंभीर जखमी झाल्याने सापनर‎ यांना तातडीने डाॅ. दत्तात्रय कोळपे‎ यांच्या दवाखान्यात हलवले.‎ प्राथमिक उपचारानंतर त्यांना‎ कोळपेवाडी ग्रामपंचायतीच्या‎ रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण‎ रुग्णालयात दाखल केले. मात्र,‎ तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.‎ मुकादम मच्छिंद्र हाळनोर‎ यांच्याकडे ते ऊसतोडणीसाठी‎ आले होते. कारखान्याचा हंगाम‎ संपण्यास काही दिवस राहिले‎ असताना, सापनर यांचा दुर्दैवी मृत्यू‎ झाल्याने ऊसतोडणी कामगारांमध्ये‎ शोककळा पसरली होती.‎

बातम्या आणखी आहेत...