आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुरी तालुक्यातील वांबोरी येथे प्रसाद शुगरकडे निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली बाजारसमितीसमोर सायंकाळी सातच्या सुमारास उलटली. या ट्रॉलीखाली एक मोटरसायकल अडकली असून उशिरापर्यंत ट्रॉली बाजुला काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. वांबोरी ही मोठी बाजारपेठ असून मुख्य रस्त्यालगत बसस्थानक, दोन शाळा, बाजार समिती, ग्रामपंचायत कार्यालय, बाजारतळ असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत याच रस्त्यावरून डबल ट्रॉली जोडून धोकादायक पद्धतीने ऊसाची वाहतूक केली जाते. शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास ट्रॅक्टर (एम.एच. २३, टी. २६६० ) दोन ट्रॉली जोडून ऊस घेऊन साखर कारखान्याकडे जात असताना, एक ट्रॉली उलटली. या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समजली. उशिरापर्यंत ट्रॉली काढून रस्ता रिकामा करण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान, या अपघातात एक मोटारसायकल अडकल्याचे दिसून आले. या घटनेमुळे गावातील मुख्य मार्गावरून होत असलेली धोकादायक पद्धतीने डबल ट्रॉलीची वाहतूक चर्चेचा विषय ठरली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.