आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली:स्वाभिमानी शेतकऱ्यांची आज राहुरीत धडकणार ट्रॅक्टर रॅली

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक रकमी एफआरपीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शुक्रवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे. जिल्ह्यात राहुरी येथे ट्रॅक्टर रॅलीसह शेतकरी आंदोलन छेडणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली.मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपीसह अधिक दोनशे रुपये मिळावे तसेच महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दोन तुकड्यातील एफ आरपीचा कायदा बदलून एक रकमी एफआरपी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार टाकळी मीया येथून ट्रॅक्टर रॅली सकाळी साडेनऊच्या सुमारास निघून दहा वाजेपर्यंत राहुरी येथे पोहोचणार आहे.

या रॅलीत शंभर ट्रॅक्टर तसेच हार्वेस्टर जेसीबी आधी शेतीची अवजारे घेऊन मनमाड रस्त्यावर हे आंदोलन केले जाईल. महिनाभरापासून राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. तसेच केंद्र व राज्य सरकारकडेही पाठपुरावा करत आहोत. मात्र दोन्ही सरकारकडून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...