आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये भीषण अपघात:कंटेनरने रिक्षाला उडवले, 6 जण जागीच ठार, 4 गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यातला कोपरगाव तालुका भीषण अपघाताने हादरला असून, त्यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 4 जण गंभीर जखमी झालेत. कंटेनरने रिक्षाला उडवल्याने पोहेगाव कोपरगाव रोडवर ही भीषण दुर्घटना घडली. जखमींवर जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कशी घडली घटना?

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव कोपरगाव रोडवर एका कंटेनरने रिक्षाला उडवले. या अपघातामध्ये एकूण 10 जण जखमी झाले. दुर्घटना इतकी भीषण होती की, त्यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा समावेश असल्याचे समजते. यातील सहा जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, तर जखमींमधील चारही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...