आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या बावीस वर्षीय तरुणास पोलिसांनी केली अटक

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलापूर येथील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून बावीस वर्षीय आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या मुलीस अयोध्या कॉलनी येथे राहणारा सलीम लतीफ सय्यद गेल्या दोन महिन्यांपासून त्रास देत होता.

बुधवारी सकाळी त्याने पीडित मुलीस अडवून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडीतेने नागरिकांना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी सलीम सय्यद वय २२ याचे विरोधात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...