आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पकडली:52 हजाराची गावठी दारू पकडली

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून ३ आरोपी विरुद्ध कारवाई करीत स्थानिक गुन्हे शाखेने ५२ हजाराची दारू पकडली. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेवरून पोहेकॉ बबन मखरे, विजयकुमार वेठेकर, पोना शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

विशेष मोहीम राबवून गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे ९०० लिटर कच्चे रसायन, ७० लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त केली. ३ आरोपींविरुध्द श्रीरामपूर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...