आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:बंद पथदिवे सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा; आयुक्तांना दिले निवेदन

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरफोड्या, दरोड्यामुळे नागरिकांत आधीच भीतीचे वातावरण असताना रस्त्यांवरील पथदिवे बंद पडल्याने नागरिकांच्या भीतीमध्ये भर पडली आहे. काटवन खंडोबा रोड, गाझीनगर व साई कॉलनी भागातील पथदिवे सुरु करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. यावेळी शहराध्यक्ष गुलाम अली शेख, कार्याध्यक्ष दानिश शेख, नौमान सय्यद, साहिल बागवान, रब्बानी दस्तगीर, जुबेर बागवान आदी उपस्थित होते.

काटवन खंडोबा रोड, गाझीनगर व साई कॉलनी भागातील रस्त्यांवरील सर्व पथदिवे बंद आहेत. या भागात काही दिवसांपूर्वी घरफोडी व दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे आहे. अंधारामुळे चोरांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळत आहे. महापालिकेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरातील सर्व पथदिवे सुरू करावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...