आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठिंबा:भारत जाेडाे यात्रेच्या समर्थनार्थ नगर शहरात स्वागत यात्रा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात राहूल गांधी यांची ‘भारत जोडो’ सोमवारी यात्रा दाखल होणार आहे, यापार्श्वभूमीवर युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यापासून पदयात्रा काढून भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शवला. स्वागतासाठी अहमदनगर शहरात विविध क्षेत्रातील नागरिकांच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेची सुरुवात करण्यात आली. यात्रेचे आयोजन लोकशाहीवादी कार्यकर्ते गणेश शिंदे, आंनद शितोळे, सचिन वारुळे, प्रशांत जाधव, जैद शेख, बापू चंदनशिवे, महादेव गवळी, प्रवीण अनभुले, राहूल ठाणगे, फराज पठाण यांनी केले होते.

अहमदनगर शहरातील स्वागत यात्रेसाठी सोशल मीडियावर युवकांना व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. सोशल मीडियावर सक्रीय लोकशाहीवादी नागरिकांचा, युवकांचा व पुरोगामी पक्ष संघटनांचा मोठा प्रतिसाद या यात्रेला मिळाला. यात्रेत युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेची सुरुवात शहीद भगतसिंग पुतळा येथून झाली. पंडित नेहरू, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती चौथे शिवाजी महाराज, रावसाहेब पटवर्धन, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही यात्रा महात्मा गांधी पुतळा या नियोजित ठिकाणी पोहचली.

या ठिकाणी भारत जोडो यात्रेबद्दल मनोगत व्यक्त केले. शिंदे म्हणाले, राहुल गांधी यांनी काढलेली यात्रा सामान्य माणसांच्या प्रश्नांवर बोट ठेवत, सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांवर आसूड ओढणारी आहे. देशातील द्वेष निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीची वाढ झाली आहे. यावर मात करायची असेल तर प्रेमाने करता येऊ शकते ही भूमिका घेऊन राहुल गांधी चालत आहेत. या यात्रेला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही लोकशाहीवादी युवकांनी व नागरिकांनी मिळून अहमदनगर शहरात स्वागत यात्रेचे आयोजन केले होते, असे सांगितले.

जैद शेख म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत भारतात युवक आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या हक्कासाठी काम करणे गरजेचे आहे. या दोन्ही घटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राजकीय नेते बेरजेचे राजकारण करण्यात व्यस्त असून त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलेले आहे. ज्या ज्या वेळी युवकांची यात्रा निघाली आहे त्यावेळी क्रांती झालेली आहे हा भारताचा इतिहास आहे. यावेळी खासेराव शितोळे, कॉ.भैरवनाथ वाकळे,पवन गरड, सोनल कोथिंबीरे, युनूसभाई, संध्या मेढे, माधुरी चोभे, सुनील गोसावी, पांडुळे मामा, संजय झिंजे, महेश भोर, अर्षद शेख, तेजश्री साळवे, पूजा झिने, अशोक शब्बन, सचिन अस्वर, रोहन नलगे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...