आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात महिला ठार:ट्रक खाली चिरडून ओझरची महिला ठार

संगमनेर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीला मालवाहू ट्रकने धडक दिल्याने ट्रक खाली सापडून विमल कारभारी शिंदे (वय ६४) ही महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती कारभारी सोन्याबापू शिंदे (ओझर खुर्द ता. संगमनेर) हे जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता संगमनेर बस स्थानकासमोर घडली. नागपंचमी सणाच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. वृद्ध शिंदे दांपत्य मोपेड दुचाकीवरून (एमएच १७ बीएफ ७७६७) संगमनेर बस स्थानकासमोरून चालले असता मालट्रकने (एम.एच. १२ एफ.सी. ५९९०) त्यांना धडक दिली.

धडकेत विमल शिंदे चाकाखाली येऊन या जागीच ठार झाल्या. बाळासाहेब कारभारी शिंदे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक अनिल अशोक गेठे (समनापुर, ता. संगमनेर) याच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विमल शिंदे यांच्यावर मंगळवारी दुपारी ओझर खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...