आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अत्याचाराच्या गुन्ह्यात महिलेला अटक‎

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तोफखाना पोलिस ठाण्यात चार वर्षांपूर्वी‎ दाखल अत्याचार व पोक्सोच्या गुन्ह्यात एका‎ महिलेला पोलिसांनी अटक केली. मालनबाई‎ शामराव फुलारे असे या महिलेचे नाव आहे.‎ न्यायालयाने तिला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी‎ सुनावली. ऑगस्ट २०१८ मध्ये एका अल्पवयीन‎ मुलीला लग्नाचे अमिष दाखवून आरोपी प्रविण उर्फ‎ चिमा शामराव फुलारे (रा. वैजापूर, जि. आैरंगाबाद,‎ हल्ली रा. तपोवन रोड, सावेडी) याने पळवून नेत‎ अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

आरोपी‎ प्रविण उर्फ चिमा शामराव फुलारे हा अद्यापही पसार‎ आहे. याच गुन्ह्यात मालनबाई शामराव फुलारे‎ हिचाही आरोपीमध्ये समावेश करण्यात आला होता.‎ तिला वैजापूर येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिस‎ निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली‎ सहाय्यक पोलिस निरीक्षक जुबेरअहमद मुजावर,‎ पोलिस हवालदार प्रदीप बडे, पोलिस नाईक सलीम‎ शेख, महिला पोलिस शिपाई प्रियंका भिंगारदिवे यांनी‎ ही कारवाई केली.‎

बातम्या आणखी आहेत...