आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:एमआयडीसीतील रेणुकामाता मंदिरातून महिलेचे पाच तोळ्याचे गंठण चोरीला

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागापूर एमआयडीसीतील निंबळक रोडवरील रेणुकामाता मंदिरातून एका महिलेचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरीला गेले. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्वेता हर्षल भोईटे (रा. बदलापुर ता. अंबरनाथ, जि. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी श्वेता भोईटे शुक्रवारी दुपारी रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी त्यांच्याकडील पर्स मंदिरातील रूममध्ये ठेवली होती. या पर्समध्ये त्यांचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण होते. रूमचा दरवाजा उघडा होता. दुपारी साडेतीनला अज्ञात चोरट्याने पर्समधील पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरले.

बातम्या आणखी आहेत...