आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेधार्थ काम बंद:अधिकाऱ्यांवरील आरोपांच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन

कोपरगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषदेचे प्रभारी नगर अभियंता सुनील ताजवे यांच्यावरील मानहानीकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पालिकेच्या अधिकारी-कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन केले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला.

नगरपरिषदेचे साठवण तलावातील पाणीपातळी खाली गेल्याने शेवाळयुक्त पाणीपुरवठा झाला होता. परंतु, वस्तुस्थिती लक्षात न घेता अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आरोप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे प्रभारी नगर अभियंता सुनील ताजवे यांच्याबाबत मानहानीकारक विधान केले होते. याबाबत नगरपरिषदेतील अखिल भारतीय सफाई कामगार संघटना, नगरपरिषद कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य संवर्ग कर्मचारी संघटना यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत जाहीर निषेध केला.

नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी यांच्यावर केलेले वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी, राजकीय हेतूने नाहक बदनामी करण्याचे मानसिकतेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी नगरपरिषद कार्यालयासमोर मुख्याधिकारी शांताराम गोसावी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात नगरपरिषद ठेकेदार संघटनाही सहभागी झाली होती. नगरपरिषद ठेकेदारांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी व राजकीय पोळी भाजण्यासाठी बेछूट आरोप करीत असल्याचे मत ठेकेदारांनी व्यक्त केले. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यास प्रतिसाद देत, कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.

बातम्या आणखी आहेत...