आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:खड्डा चुकवताना तरुणाचा मृत्यू

राहुरी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खड्डा चुकविताना मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. अजय बोरूडे वय २८, रा. बारागाव नांदूर रोड ( चौधरी वस्ती ) असे मृत तरुणाचे नाव आहे. नगर मनमाड राज्य महामार्गावरील राहुरीच्या पेट्रोल पंपाजवळ अपघाताची ही घटना घडल्याने रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्याचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला आहे. अजय बोरूडे हा गॅरेजचे काम आटोपून मोटरसायकलवर घरी जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवताना खाली पडल्याने गंभीर जखमी झाला.

जखमी अजयला इतर वाहनातून दवाखान्यात हलविण्यात आले.मात्र उपचारांपूर्वीच अजयचा मृत्यू झाला. बोरुडेच्या कुटुंबाचे राहुरी नांदूर रस्त्यावरील चौधरी मळ्यात वास्तव्य आहे. अजय हा आई वडिलांना एकूलता एक मुलगा होता.

बातम्या आणखी आहेत...