आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:आधार मतदार कार्डाशी लिंक करावेत : प्रांताधिकारी पवार

श्रीरामपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात निवडणूक ओळखपत्रास आधार क्रमांक लिंक करण्यासाठीच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मतदारांनी आपला आधार क्रमांक लिंक करावा असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

या मोहिमेला श्रीरामपूर तालुक्यात सुरुवात झाली. श्रीरामपूर मतदारसंघात एकूण ०२ लाख ९७ हजार मतदार आहेत. याबाबत घरोघरी जाऊन यावर जनजागृती केली जात आहे. त्यामुळे एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव असल्यास ते शोधणे सोपे होणार आहे. यामुळे एकाच मतदारामार्फत वेगवगेळ्या ठिकाणी असलेल्या नावनोंदणीला यामुळे टाच बसणार आहे.मतदार कार्ड आधाराशी लिक करण्यासाठी ६ ब क्रमांकाचा अर्ज भरावा लागणार आहे, हा अर्ज ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी भरता येणार आहे.

आधारसह मनरेगा जॉबकार्ड, पॅनकार्डसह इतर माहितीही या अर्जावर भरायची आहे. मतदार कार्ड आधारशी जोडण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवर मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...